‘न कळलेली आई’ – मातृ दिना निमित्त आईसाठी कविता

आज १२ एप्रिल ‘mothers day’ म्हणजेच मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आई म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक असतो. तर आजच्या या विशेष दिवशी आम्ही या ब्लॉग पोस्ट मध्ये आईविषयी खूप सुंदर कविता घेऊन आलो आहोत. त्या तुम्ही वाचून आपल्या आईसाठी समर्पित करू शकता.   कविता क्र. १

न कळलेली आई

mothers day
आई ही कुणाला नाही कळली मुलांसाठी ती आयुष्यभर झटली रक्ताचे पाणी तीने केले मुलांना कौतुकाने वाढविले सोन्याचे दागिने तीने विकले मुलांचे शिक्षण तीने पुर्ण केले मुलांसाठी कितीदा उपाशी राहीली आई ही कुणाला नाही कळली मुलांसाठी ती आयुष्यभर झटली फाटकी साडी ती नेसली तुटकी चप्पल तीने घातली हाल अपेष्टा सहन करुनी एक एक रुपया जमा करुनी मुलांसाठी तीने माडी बांधली आई ही कुणाला नाही कळली मुलांसाठी ती आयुष्यभर झटली इतके करुनही मुले विचारती आई आमच्यासाठी तु काय केले उपकार माझे ते विसरले काय सांगावे बरे मी आता मुलांसाठी कुठे कमी मी पडली आई ही कुणाला नाही कळली मुलांसाठी ती आयुष्यभर झटली – यशवंत दंडगव्हाळ  
कविता क्र. २

आई म्हणजे

आई म्हणजे वात्सल्यरुपी अखंड  खळाळणारा झरा अवघ्या विश्वातील अढळ शाश्वत  शब्द हाच  खरा . जिथं  क्षणभर विसावण्यास असते एक  शीतल  छाया चिरंतन  प्रेमातनं साकारलेली एक  वेडी  माया आई म्हणजे ममत्वाची असते  साक्षात  मुर्ती सृष्टी निर्मात्याची एक अप्रतिम  कलाकृती निस्वार्थ  प्रेमाचीच एक श्रुती शब्दचि अपुरे पडतात वर्णिता तिची महती आई म्हणजे असते एक  जीवनशाळा. अनुभवाया मिळतो तिथे दुखाचा कळवळा  हास्याचा उमाळा आई असतं एक हक्काचं स्थळ धाय मोकलून  रडण्याचं खळाळून हसण्याचं आई कसा होवू  तुझा उत्तराई कशी फेडावी तुझी ॠणाई. mothers day
  कविता क्र. ३

आई म्हणजे अशी माया

आई म्हणजे अशी माया जिला अंत नाही मी वेडा पाण्यात पाहतो जेव्हा आईचेच प्रतिबिंब मला दिसत जाई कविता लिहाविशी वाटते आईवर तर कधी गावे वाटते तिचे गुणगान प्रेम शोधले जगात तरी ही मिळणार नाही आईचे प्रेम महान अरे प्रेम, लाड, मदत हे तर सर्वांची आई करते पण माझ्यासाठी आई जे करते ते मला जगातल्या आईंपेक्षा वेगळे वाटते सातसमुद्रांच्या पलिकडे डोंगरदर्‍यांच्या अलिकडे अश्या ठिकाणी न्यावे आईला जिथे वात्सल्य व आईच दिसावी सगळीकडे मोठा झालो असलो तरी मी आईसमोर लहान आहे पुन्हा बालपणात जावून आईच्या कुशीत निजण्याची तहान आहे mothers day